आलो रेsss; 70 वर्षांनंतर भारतात आलेल्या चित्त्यांची पहिली झलक, नजर रोखून पाहा हा Video

Project Cheetah : भारतात पुन्हा पाहता येणार, 'चिते की चाल....'

Updated: Sep 16, 2022, 09:04 AM IST
आलो रेsss; 70 वर्षांनंतर भारतात आलेल्या चित्त्यांची पहिली झलक, नजर रोखून पाहा हा Video  title=

Project Cheetah PM Narendra Modi's Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM  Modi) यांचा यंदाचा वाढदिवस म्हणजेच 17 सप्टेंबर हा दिवस देशासाठी अत्यंत खास असणार आहे. कारण, देशात खास पाहुण्यांचं आगमन होत हे. तेसुद्धा तब्बल 70 वर्षांनंतर. भारतातून नामशेष झालेली ही प्रजाती पुन्हा एकदा देशात आल्यामुळं सध्या सर्वत्र आणि विशेष म्हणजे प्राणीप्रेमींमध्ये कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे. 

नामिबियातून (namibia) भारतात आलेल्या याच चित्त्यांची पहिली (Cheetah First look) झलक नुकतीच समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही दृश्य पाहता येत आहेत. यामध्ये चित्ते नजर रोखून पाहताना दिसत आहे. 

चित्त्यांची (Cheetah ) ही झलक पाहताना आणि त्यांची एखाद्या गोष्टीचा मागोवा घेत पडणारी पावलं पाहता, 'चिते की चाल...' हा डायलॉग आठवल्यावाचून राहत नाही.  

चित्त्यांसाठी खास विमान
चित्त्यांना आणण्यासाठी खास बोईंग विमानाची सोय करण्यात आली आहे. विंडहोक विमानतळावर हे विमानत उतरलं. मुख्य म्हणजे चित्त्यांसाठी या विमानात खास बदलही करण्यात आले. 

नामिबीयाहून आलेले हे पाहुणे यापुढे (Madhya Pradesh) मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात जातील. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हे भारताला हे अनोखं गिफ्ट ठरत आहे.