Video: जेव्हा प्रियंका गांधी यांनी हातात धरला साप

प्रियंका गांधी यांचा एक वेगळा अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

Updated: May 2, 2019, 01:51 PM IST
Video: जेव्हा प्रियंका गांधी यांनी हातात धरला साप title=

रायबरेली : निवडणुकीत राजकारण्यांचे वेगवेगळे रुप पाहायला मिळतात. कधी भाषणांमधून तर कधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या कृतीतून. असंच काही वेगळं रुप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे देखील पाहायला मिळालं. ज्यामध्ये न घाबरता ते साप हातात घेताना दिसत आहेत. सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात प्रचार करत असताना प्रियंका गांधी या गारुडी सोबत बोलताना दिसत आहेत. प्रियंका गांधी यांनी यावेळी सापांची माहिती घेतली. या दरम्यान त्यांनी एक साप हातात देखील घेतला. या दरम्यान त्यांच्या आजुबाजुला शेकडो लोकं उपस्थित होते.

प्रियंका गांधी मागील काही दिवसांपासून रायबरेली आणि अमेठीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. याआधीच्या निवडणुकीत ही त्या मतदारसंघात येत होत्या. पण राजकारणात पूर्णपणे सक्रीय झाल्यानंतर त्यांचा हा दौरा आहे. प्रियंका यांना पक्षाने महासचिव बनवलं आहे. त्यांच्याकडे उत्तरप्रदेशच्या एका भागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याआधी देखील प्रियंका गांधी यांचं वेगवेगळं रुप पाहायला मिळालं आहे. अमेठीमध्ये त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा देखील वेगळा अंदाज पाहायला मिळाला. एका शेतात आग लागल्यानंतर स्मृती इराणी आग विझवण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित लोकांसोबत मदतीसाठी पोहोचल्या.