पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून आरोपी फरार

उपचाराकरता रूग्णालयात दाखल झालेला आरोपी फरार झाला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 19, 2018, 03:22 PM IST
पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून आरोपी फरार  title=

मुंबई : उपचाराकरता रूग्णालयात दाखल झालेला आरोपी फरार झाला आहे. 

दिल्लीतील लोक नायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये भर्ती झालेल्या कैदीने पोलिसांच्या हातावर तुरी दिली आहे. कैद्याने पोलिसांच्या डोळ्यात चक्क लाल मिरची पावडर टाकून तिथून पळ काढला आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी संदीप ढिल्लोला उपचाराकरता सोमवारी दिल्लीतील रूग्णालयात दाखल केले. उपचारावेळी त्याने पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टकाली. 

मिरची टाकल्यामुळे काही काळ हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाला. आणि याचा फायदा घेत आरोपीने तेथून पळ काढला आहे. या घटनेचा तपास आता पोलिस करत आहेत.