नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. देशात कोरोनाचे वाढते संक्रमण आणि भारत-चीन वाद या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेशी संवाद साधणार आहेत. अशा परिस्थिती पंतप्रधान मोदी जनतेशी काय संवाद साधणार? याकडे साऱ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे.
१ जुलै रोजी देशभरात अनलॉक २.० ला सुरूवात होणार आहे. या दरम्यान पंतप्रधान ३० जून रोजी संवाद साधणार असून मोठी घोषणा करतील की काय? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. या अगोदर रविवारी 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी म्हटलं की, एका वर्षात अनेक संकट आली तरी ते वर्ष खराब वर्ष ठरत नाही. भारताचा इतिहास आहे की, आलेल्या संकटावर भारताने यशस्वी मात केली आहे.
Prime Minister @narendramodi will address the nation at 4 PM tomorrow.
— PMO India (@PMOIndia) June 29, 2020
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आपले शेजारील देश जे करत आहे. त्या सर्व संकटांवर आपण मात करत आहोत. एकाचवेळी देशावर चहुबाजूंनी संकट आली आहे. अशी स्थिती फारच कमी वेळा पाहायला मिळाली.
Prime Minister Narendra Modi will address the nation at 4 PM tomorrow: Office of the Prime Minister (PMO) pic.twitter.com/PwIgD7xZSj
— ANI (@ANI) June 29, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी ४ वाजता काय बोलणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्राने ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. आता भारतासाठी पंतप्रधान मोदी काय निर्णय घेतात. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने ५९ चीनी ऍपवर बंदी आणल्याचा निर्णय देखील घेतला आहे. अशा परिस्थितीत उद्या मोदी काय बोलणार हे महत्वाचं ठरणार आहे.