पंतप्रधान मोदींची महत्त्वाची बैठक, लसीकरण आणि देशातील परिस्थितीचा घेतला आढावा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, '100 वर्षांनंतर आलेली ही भयानक साथ जगाची परीक्षा घेत आहे.'

Updated: May 15, 2021, 02:46 PM IST
पंतप्रधान मोदींची महत्त्वाची बैठक, लसीकरण आणि देशातील परिस्थितीचा घेतला आढावा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशभरातील कोरोना लसीकरणाच्या परिस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याआधी बुधवारी पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठा आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. पंतप्रधान म्हणाले की, देशभरातील सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे जावून लस घ्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, '100 वर्षांनंतर आलेली ही भयानक साथ जगाची परीक्षा घेत आहे.' आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. सरकार सक्रियपणे औषधांच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आली. लसीकरणाचा तिसरा टप्पा देशात सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत लसीकरणाचे एकूण 18,04,29,261 डोस देण्यात आले आहेत.

आता सलग चार दिवसांपासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही संसर्गाच्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली आहे. देशात सध्या 37 लाख सक्रीय रुग्ण आहेत.

राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून शुक्रवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3,26,014 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 3,52,850 रुग्ण बरे झाले आहेत आणि 3,876 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण संक्रमणाचा आकडा दोन कोटी 43 लाख 72 हजारांवर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत 2 कोटी, 4 लाख 26 हजार रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत 3,66,229 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशात आता 36,69,537 सक्रिय प्रकरणे आहेत.