कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ!

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे.

Updated: Feb 6, 2022, 08:20 AM IST
कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ! title=

मुंबई : कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. 

सौदी अरेबियाने कच्चा तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ केली आहे. भारतासह आशियातील इतर देश, अमेरिका आणि युरोपला ९५ डॉलर्स प्रति बॅरलने तेल दिलं जात आहे. याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होणार असून पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी भडकणार आहेत.

तर दुसरीकडे खाद्यतेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवर साठवण मर्यादा लागू केली आहे.

खाद्यतेलाची साठा मर्यादा किरकोळ विक्रेत्यांसाठी 30 क्विंटल, घाऊक विक्रेत्यांसाठी 500 क्विंटल आणि मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी, दुकानांसाठी 1 हजार क्विंटल केली आहे. खाद्यतेलाचे प्रोसेसर त्यांच्या साठवण क्षमतेच्या 90 दिवसांचा साठा करू शकणार आहेत.