समाज सुसंस्कृत वर्तन करणारा हवा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशात सुरू असलेल्या भोवतालच्या घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात उमटले होते. 

Updated: Jan 26, 2018, 10:27 AM IST
समाज सुसंस्कृत वर्तन करणारा हवा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशात सुरू असलेल्या भोवतालच्या घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात उमटले होते. 

‘विरोधी मतांचा आब राखणे अत्यावश्यक’ 

'एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची सारी मते पटतीलच असे नाही. हे असे मतभेद व्यक्त करण्यासही काहीच हरकत नाही. मात्र ते व्यक्त करताना विरोधी मतांचा आब राखणे अत्यावश्यक आहे. आपला समाज असे सुसंस्कृत वर्तन करणारा हवा', असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

‘स्वातंत्र्याची बूज राखायला हवी’

'सुसंस्कृत व्यवहार असणारे लोक सुसंस्कृत देश उभा करू शकतात. मग हे लोक गावातील असोत किंवा शहरातले. आपल्या शेजाऱ्यांचा अवकाश, त्यांचा खासगीपणा, त्यांचे हक्क याबाबतची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. सणासुदीचा उत्साह असो, वा एखादी विरोधी निदर्शने, प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची बूज राखायला हवी', अशी पुस्ती कोविंद यांनी जोडली.