नवी दिल्ली : सर्व शक्यतांना पूर्णविराम देत एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (NDA President Candidate) म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्या झारखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केलीये.
मुर्मू यांच्या नावाची घोषणा करताना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पहिल्यांदाच एका महिला आदिवासी उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी आम्ही द्रौपदी मुर्मू यांना एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करतो.
Draupadi Murmu, BJP's nominee for Presidential elections likely to file her nomination on June 25: Sources
— ANI (@ANI) June 21, 2022
मूर्मू यांच्या नावाच्या घोषणेने गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपचे लक्ष आदिवासी समाजावर असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
देशाला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी आजपर्यंत देशात एकही आदिवासी राष्ट्रपती झालेला नाही.
द्रौपदी मुर्मूने आपल्या आयुष्यात बराच काळ शिक्षिका म्हणून काम केले आहे. द्रौपदी मुर्मू यांनीही सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात सतत सक्रिय असलेल्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही द्रौपदी मुर्मूच्या नावाचे स्वागत केले आहे.
त्यांनी ट्विट करत म्हटले की, द्रौपदी मुर्मूजींनी आपले जीवन गरिबांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांना अनेक वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. मला खात्री आहे की त्या एक महान राष्ट्रपती म्हणून सिद्ध होतील. त्यांच्या नावाची घोषणा करून पक्षाने एकीकडे आदिवासी समाजाला जोपासण्याचे काम केले आहे तर दुसरीकडे महिला सक्षमीकरणाचा संदेशही दिला आहे.