Deliveries halted For Ramlalas Birth: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी हा भव्य सोहळा संपूर्ण देशाने पाहिला. तसेच लाखो रामभक्तांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मागच्या अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती. दुसरीकडे पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामलल्लाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या.
आपल्या होणाऱ्या बाळाचा जन्म शुभ मुहुर्तावर व्हावा, प्रभू रामाप्रमाणे यशवंत, किर्तीवंत व्हावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. 22 जानेवारी 2024 ला प्रभू राम अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. या शुभ दिनाचा मुहूर्त साधण्याचा निर्णय काही पालकांनी घेतला. काही मातांनी ही इच्छा डॉक्टरांना बोलून दाखवत 22 जानेवारी हा आपल्या मुलांचा जन्मदिवस केल्याचे समोर आले आहे. मातांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलांनी 22 जानेवारीला या जगात पाऊल टाकले. 22 जानेवारी रोजी पटना, बिहारमध्ये साधारण 500 हून अधिक मुलांचा जन्म झाला.
आपल्या मुलाचा जन्म 22 जानेवारीला व्हावा अशी अनेक महिलांची इच्छा होती दरम्यान पटनासहित अनेक जिल्ह्यातील विविध नर्सिंग होमचे डॉक्टर प्रसूतीमध्ये व्यस्त होते.आयजीआयएमएस, पीएमसीएच, एनएमसीएचसहित अनेक खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालयात 22 जानेवारीला प्रसूती झाल्या. या दिवशी साधारण 37 डिलीव्हरी माझ्या हातून झाल्याचे डॉक्टरांनी पुढे सांगितले. या मुलांचा जन्मदिवस ऐतिहासिक झाल्याची प्रतिक्रिया डॉ. सारिका राय यांनी यावेळी दिली.
विशेष म्हणजे आपल्या मुलाचा जन्म 22 जानेवारीला व्हावा अशी माता आणि त्यांच्या पालकांची इच्छा होती. 22 जानेवारीला प्रभू श्रीराम आपल्या घरी पोहोचले. त्याप्रमाणे माझ्या घरी आलेल्या सदस्यामध्येदेखील प्रभू रामाचे गुण असावेत, असे जन्म दिलेल्या मुलाच्या पालकांनी सांगितले.
दुसरीकडे ज्योतिषांनीदेखील 22 जानेवारी ही दिनांक शुभ सांगितली होती. या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवंत असतील. कमी वयात त्यांचा भाग्योदय होईल आणि ते आपल्या करिअरमध्ये टॉपला असतील, असे ज्योतिष डॉ. श्रीपती त्रिपाठी यांनी सांगितले.