प्रसूतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात निघाले, रस्त्यात कारला आग लागली आणि नको ते घडलं... Video

पत्नीला प्रसूतीकळा सुरु झाल्याने पती पत्नी आणि चार जण कारने रुग्णालयाच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच कारने अचानक पेट घेतला आणि दोघांचा जळून मृत्यू झाला

Updated: Feb 2, 2023, 07:26 PM IST
प्रसूतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात निघाले, रस्त्यात कारला आग लागली आणि नको ते घडलं... Video title=

Couple Dead In Car Fire: मन सून्न करणारी एक घटना समोर आली आहे. कारला आग (Car Fire) लागल्याने पतीसह गरोदर महिलेचा मृत्यू (Couple Dead in Car Fire) झाल्याची घटना घडली आहे. आग इतकी भयानक होती की कोणालाच या दाम्पत्याला वाचवण्याची संधी मिळाली नाही. कारमध्येच त्या गरोदर महिला आणि तिच्या पतीचा जळून दुर्देवी मृत्यू झाला. महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या, त्यामुळे तिचा पती तिला रुग्णालयात घेऊन निघाला. पण रस्त्यातच त्यांच्या कारला भीषण आग लागली. ( Kerala Couple Dead in Car Fire)

केरळच्या कन्नूर (Kannur) जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये सहा जण होते. यात एका चारजणं कारच्या मागच्या सीटवर बसले होते. तर पती कार चालवत होता, आणि पत्नी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसली होती. कारला आग लागली तेव्हा मागच्या सीटवर बसलेले चारही जण बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण आगीने वेग पकडल्याने पुढे बसलेल्या पती आणि पत्नीला बाहेर पडता आलं नाही. 

अपघात नेमका कसा झाला?
कन्नूरच्या सरकारी रुग्णालयाजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारचा दरवाज उघडता न आल्याने पती-पत्नी कारमध्ये अडकले असावेत. मृत पती-पत्नी हे कुट्ट्याटट्टूर मध्ये राहणारे आहेत. पतीचं वय 35 तर पत्नीचं वय 26 होतं. पत्नीला प्रसूती कळा सुरु झाल्याने तपासणीसाठी पती तिला सरकारी रुग्णालयात घेऊन जात होता. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार कारला आग लागल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना वाचवण्याता प्रयत्न केला. पण कारचा दरवाजा न उघडल्याने ते अयशस्वी ठरले. 

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्य माहितीनुसार कारच्या इंजिनला लागलेली आग अचानक भडकली, हवा असल्याने कार वेगाने पसरली. त्यामुळे त्यांना बाहेर पडण्यासाठी कोणाला मदत करता आली नाही. शिवाय आगीमुळे पेट्रोलची टाकी फुटण्याचीही भीती होती. पोलिसांनी सध्या कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

कारला आग कोणत्या कारणाने लागली, याचा शोध तज्ज्ञांकडून घेतला जात आहे. पण या घटनेने कन्नूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.