नवी दिल्ली : प्रद्यु्म्न हत्येप्रकरणी अटक केलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सीबीआयवर आरोप केले आहेत. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बाल न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आरोपीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले.
'सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी माझ्या मुलाला उलटे लटकवून अत्यंक क्रूरपणे मारले. ' असे त्यांनी म्हटले. माझा मुलगा निर्दोष आहे. ११ वीचा विद्यार्थी मर्डर केल्यानंतर एवढा सामान्य वागू शकतो का ? याचा तुम्ही विचार करु शकता का ? ' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शनिवार म्हणजे आज ११ वीतील आरोपी विद्यार्थ्याची रिमांड संपली . त्यानंतर सुमारे दोनच्या सुमारास त्याला ज्युविनाईल जस्टिस बोर्डासमोर सादर केले गेले.
प्रद्युम्न हत्या प्रकरणातील आरोपीच्या वडीलांनी आपल्या मुलाची बाजू मांडली. माझा मुलगा अभ्यासात हुशार आहे, तुम्ही त्याची मार्कशिट बघा असे त्यांनी सांगितले. हा विद्यार्थी अभ्यासात कच्चा होता असा दावा सीबीआयने केला होता. हा दावा खोटा असल्याचे आरोपीच्या वडिलांनी सांगिते. परीक्षेचा दिवस पुढे जावा यासाठी प्रद्युम्नी हत्या झाली असा दावा करण्यात आला होता.
फुटेजच्या आधारे सीबीआयने ११ वीतील एका विद्यार्थ्याला आरोपी केले. नेमके तेच फुटेज गुरूग्राम पोलिसांकडून पहायचे राहिले होते .परिणामी त्यांनी बस कंडक्टरला आरोपी म्हणून समोर केले होते.
न्यायालयाची पुढील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.