इंदौर : मंत्री असो किंवा अधिकारी तक्रार केल्यानंतर अनेक खेटे घालावे लागतात त्यानंतर काम पूर्ण होतं. चक्क विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन एका मंत्र्याने शौचालय स्वच्छ केल्याची घटना समोर आली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील ग्वालियर इथे सरकारी शाळेत शौचालय स्वच्छ केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी यासोबत लोकांना स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्याचा संदेश दिला. ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह यांचे याआधी सार्वजनिक शौचालय स्वच्छ करतानाचे फोटो समोर आले होते.
इतकच नाही तर स्वच्छतेचा संदेश देत त्यांनी रस्त्यावरही झाडू मारण्याचं काम केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न सिंह तोमर हे सरकारी कन्या माध्यमिक विद्यालयाची पाहणी करण्यासाठी आले होते. शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला. शाळेतील स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ असल्याचे विद्यार्थिनींनी मंत्र्यांना सांगितले.
Madhya Pradesh Energy Minister Pradhuman Singh Tomar cleaned the toilet of a govt school in Gwalior
"A girl student told me that there is no cleanliness in the toilets of the school, because of which the students face problems," Minister Pradhuman Singh Tomar said. (17.12) pic.twitter.com/Lcqu7QfGWL
— ANI (@ANI) December 18, 2021
विद्यार्थ्यांनी त्यांची समस्या मांडली. त्यांची अडचण लक्षात घेऊन ऊर्जा मंत्री थेट शौचालयात गेले आणि वेळ न घालवता त्यांनी स्वत:च्या हाताने स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. ऊर्जामंत्र्यांनी संपूर्ण स्वच्छतागृह स्वच्छ केलं.
एका विद्यार्थिनीने मला सांगितले की, शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो." मी 30 दिवस स्वच्छतेची शपथ घेतली आहे आणि मी दररोज कोणत्या ना कोणत्या संस्थेत जाऊन स्वच्छता करेन. ला स्वच्छतेचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. .प्रत्येकाला स्वच्छतेची प्रेरणा मिळावी यासाठी मी हे करत आहे.
प्रद्युम्न सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश केवळ लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती कऱण्याचा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.