दरमहा 55 रुपये भरा अन् महिन्याला 3000 मिळवा, शेतकऱ्यांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना, कसा लाभ घ्याल?

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 16, 2024, 06:05 PM IST
दरमहा 55 रुपये भरा अन् महिन्याला 3000 मिळवा, शेतकऱ्यांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना, कसा लाभ घ्याल? title=
Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana how to apply online

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार नव्या नव्या योजना राबवत आहे. यातीलच एक योजना म्हणजे किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गंत 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. वृद्धावस्थेत जेव्हा शेतकऱ्यांना शेती करणे कठिण होऊन जाते. तेव्हा आर्थिकदृष्ट्या त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या गोष्टी लक्षात ठेवून केंद्र सरकारने शेतकरी मानधन योजनेची सुरुवात केली आहे. 

पंतप्रधान शेतकरी मानधन योजना (PM-KMY) 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू केली होती. याचा उद्देश छोटे शेतकरी आणि SMFना पेंन्शनच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा होता. या योजनेमुळं शेतकऱ्यांना दरमहिना 3 हजार रुपयांचे मानधन मिळायचे. तसंच, कोणत्याही कारणाने लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर, त्याचे पेन्शन त्याच्या पत्नीला 1500 रुपये मानधान दिले जाते. 

55 रुपयांचा प्रतिमहिना प्रिमियम  

18 ते 40 वर्षांच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःचे नाव रजिस्ट्रेशन करु शकता. शेतकरी वयाच्या कोणत्याही वर्षी या योजनेचा हिस्सा बनू शकता. त्यानंतर दरमहिन्याला 55 रुपये ते 200 रुपयांपर्यंत पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना पेन्शनच्या माध्यमातून दरमहिना तीन हजार रुपये मिळतात. यातून ते त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकतात. 

देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरु शकते. किसान मानधन योजनेला लाभ तेच शेतकरी घेऊ शकते ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा कमी जमीन असलेले लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

अप्लाय कसं करु शकता?

या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, मोबाइल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, ओळखपत्र, वयाचे प्रमाणपत्र, आर्थिक प्रमाणपत्र, शेताचा सातबारा आणि बँक खात्याचे पासबुक असणे बंधनकारक आहे. 

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात पहिले किसान मानधन योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होम पेजवर जाऊन लॉगइन करावे लागेल. लॉगइन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक नोंद करावा लागेल. त्यानंतर त्यांना हवी असलेली माहिती द्यावी लागेल. त्यानंतर ओटीपी जनरेट करावा लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर नंबर एक ओटीपी येईल तो तिथे नोंद करावा लागेल. या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.