पोस्टाच्या गुंतवणूकीत मिळतोय जास्त फायदा, जाणून घ्या व्याजदर

बॅंक एफडीच्या तुलनेत ही पोस्ट गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते.

Updated: Jan 9, 2019, 01:08 PM IST
पोस्टाच्या गुंतवणूकीत मिळतोय जास्त फायदा, जाणून घ्या व्याजदर  title=

नवी दिल्ली : बॅंक फिक्स्ड डिपॉझिट (FD) ऐवजी तुम्ही जर पोस्ट ऑफिस एफडी स्किममध्ये गुंतवणूक करु शकता. कारण बॅंक एफडीच्या तुलनेत ही पोस्ट गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. सरकारने नुकतेच यातील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये गुंतवणूकदाराची रक्कम आणि मिळालेल्या व्याजावर सरकारी गॅरंटी मिळते. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटमध्ये 1-2-3 आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक स्किम आहेत. कोणत्याही एका अकाऊंटमध्ये केवळ एकदाच गुंतवणूक केली जाऊ शकते. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही कितीही खाती खोला पण या योजनेत तुम्हाला कमीतकमी 200 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागणार आहे. यानंतर या पटीने गुंतवणूक केली जाऊ शकते.

व्याजदर  

आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत व्याजदर ठरत असतात. जानेवारी ते मार्चसाठी व्याज दरांची घोषणा करण्यात आली आहे. एका वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर आता 6.9 टक्केच्या ऐवजी 7 टक्के व्याज मिळणार आहे. दोन वर्षांच्या टर्म डिपॉझिटवर 7 टक्के व्याज कायम राहणार आहे. दोन वर्षांच्या टर्म डिपॉझिटवर 7 टक्के व्याजदर कायम आहे. तर 5 वर्षाच्या डिपॉझिटवर 7.8   टक्के व्याजदर आहे. 

चेक पेमेंट 

 गुंतवणूकीच्या या योजनेत वार्षिक व्याजदर मिळतो. पण याची मोजणी तिमाही केली जाते. या हिशोबाने जर पोस्ट ऑफिस अकाऊंट एक वर्ष असेल तर व्याजासहित चांगली रक्कम मिळू शकेल. ठेवीच्या मुदत पूर्णतेनंतर एकूण रक्कम ही 20 हजारपेक्षा जास्त असेल तर गुंतवणूकदारांना ही रक्कम कॅशमध्ये मिळणार नाही. यापेक्षा अधिक रक्कम चेकच्या माध्यमातूनच मिळणार आहे. 

अर्ज करा  

 जर तुम्हाला दरवर्षी व्याज घेण्यासाठी जायचे नसेल तर ते व्याज पोस्टाच्या बचत खात्यात ट्रान्स्फर करण्याचा अर्ज तुम्ही पोस्टाला द्यायला हवा. जमा होणारे वार्षिक रक्कमेवरील व्याज तुमच्या खात्यात जमा होईल. पण प्रत्येक वर्षाच्या ठरलेल्या तारखेला पोस्ट ऑफिसमध्ये नवा अर्ज करावा लागेल.

करात सवलत  

जास्त तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहात तर कर चुकवताना तुमचे व्याज दर कमी होतात. पाच वर्षांच्या टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना इनकम टॅक्स नियम सेक्शन 80C नुसार टॅक्समध्ये सवलत मिळणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये कोर बॅंकिंग सुविधा (CBS) असेल तर ठेवीच्या मुदती संपल्यानंतर त्या दिवशीचा व्याज दराच्या हिशोबाने व्याज मिळत राहील.