Post Office Senior Citizen Savings Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही हिस्साची गुंतवणूक करत असतो. जिथे त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि गरजेच्या काळात योग्य परतावा मिळेल हा विचार करुन गुंतवणूक करत असतो. म्हातारपणी याच गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल या हेतूने पैसे गुंतवले जातात. देणेकरुन म्हातारपणी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठीच पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना जाहीर केल्या जातात. पोस्ट ऑफिसची सिनीयर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही योजना (Post Office SCSS Scheme) खासकरुन वरिष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेत 8 टक्क्याहून अधिक व्याज मिळते. म्हणजेच बँक एफडीपेक्षाही अधिक व्याद मिळते.
Post Office अनेक योजना चालवण्यात येत आहेत. यात सुरक्षित गुंतवणुकीची हमी सरकार देते. पोस्ट ऑफिस सिनियर सीटीजन सेव्हिंग स्कीमबद्दल बोलायचे झाल्यास इतर बँकांच्या एफडीच्या तुलनेत जास्त व्याज मिळते. या योजनेत गुंतवणुक केल्यास 20,000 रुपये महिना परतावा मिळू शकतो. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, 1 जानेवारी 2024पासून या योजनेत गुंतवणुक केल्यास 802 टक्के या दराने व्याज मिळते.
रेगुलर इन्कम, सुरक्षित गुंतवणूक आणि करात सूट याचा विचार केल्यासही Post Office SCSS Scheme पोस्टाची सगळ्यात बेस्ट स्कीम आहे. महिन्याला फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणुक करु शकतात. तर, या सेव्हिंग स्कीममध्ये जास्तीत जास्त गुंतवणुक करण्याची मर्यादा ही 30 लाख रुपये इतकी आहे. निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी पोस्टाची ही योदना फायदेशीर ठरु शकते. यात वय वर्षे 60 ते त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत जॉइन्ट अकाउंट सुरू करु शकता.
या योजनेत गुंतवणुक करण्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे गुंतवणुक करु शकता. पण जर या आधीच खाते बंद केले तर नियमांनुसार खातेधारकाला पेनल्टी द्यावे लागते. या योजनेंतर्गत काही जणांना सवलतही देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे खाते उघडताना VRS घेणाऱ्या व्यक्तीचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असू शकते, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असू शकते, तथापि, असे आहेत. यासाठी काही निर्बंध, अटीही घालण्यात आल्या आहेत.
एक गुंतवणूकदार या सरकारी योजनेत फक्त 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकतो आणि त्यात जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ठेव रक्कम रु. 1000 च्या पटीत ठरवली जाते. आता या योजनेतून 20000 रुपयांच्या नियमित कमाईचा हिशोब बघितला तर 8.2 टक्के व्याज दराने एखाद्या व्यक्तीने सुमारे 30 लाख रुपये गुंतवले तर त्याला वार्षिक 2.46 लाख रुपये व्याज मिळेल आणि हे व्याज पहा मासिक आधारावर आहे. त्यामुळे ते सुमारे 20,000 रुपये मासिक आहे.