Post Office खातेधारकांना मिळाली ही सुविधा, बातमी वाचाल तर खूश व्हाल

तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Jul 25, 2022, 07:15 PM IST
Post Office खातेधारकांना मिळाली ही सुविधा, बातमी वाचाल तर खूश व्हाल title=

Post Office News: सध्याच्या काळात पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे बहुतांश लोकांनी पोस्टात खातं उघडलं आहे. जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 20 मे पासून नवा नियम लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खातं असलेले ग्राहक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करू शकतात. पोस्ट विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसकडून एनईएफटी आणि आरटीजीएस करता येणार आहे.  म्हणजे खातेदारांना अन्य बँकांप्रमाणे पैशांची देवाणघेवाण करण्याची सुविधा मिळाली आहे. ही सुविधा 365 दिवस 24 तास असणार आहे. 

एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधा दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणं सोपं आहे. यामुळे काही वेळात पैसे ट्रान्सफर होतात. मात्र यासाठी काही नियम आणि अटी आहेत. एनईएफटीसाठी पैसे ट्रान्सफर करण्याची कोणतीच मर्यादा नाही. जर आरटीजीएसमध्ये एका वेळेस कमी कमी दोन लाख रुपये पाठवता येतात.

या सुविधेसाठी काही चार्जेस द्यावे लागतील. 10 हजार रुपयांपर्यंतच्या एनईएफटीसाठी 2.50 रुपये+जीएसटी द्यावं लागेल. तर 10 हजार ते 1 लाख रुपयांसाठी 5 रुपये + जीएसटी द्यावा लागेल. तर 1 लाख ते 2 लाख रुपयांसाठी 15 रुपये + जीएसटी, तर 2 लाखांहून अधिक रकमेसाठी 25 रुपये + जीएसटी भरावा लागेल.