नवी दिल्ली : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सासू-सुनेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका कॉलेजच्या बाजुला हे सेक्स रॅकेट सुरु होतं. या कारवाईत सासू आणि सुनेसह 3 तरुणींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या मते सासू आणि सून बाहेरुन तरुणींना आपल्या घरात सेक्स रॅकेट चालवत होती.
पोलिसांना या सेक्स रॅकेटची माहिती मिळताच यावर कारवाई केली. याआधी देखील पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला पण काही ठोस पुरावे सापडत नव्हते. पण पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सगळी कारवाई रचली. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना या ठिकाणी दारुच्या बाटल्या देखील आढळल्या आहेत.
अतिरिक्त पोलिस अधिक्षक रमन शर्मा यांनी माहिती दिली की, 'पोलिसांना ही सूचना मिळाली होती की, सुल्तानपुरामध्ये सेक्स रॅकेट सुरु आहे. या सूचने नंतर पोलिसांनी आपल्या एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवलं. त्यानंतर पोलिसांनी घरातून 3 तरुणींसह सासू-सुनेला अटक केली आहे.'