मोदींचे नेहरुंच्या पावलावर पाऊल, कुंभमेळ्याच्या तयारीवर जातीने ठेवणार लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अलाहाबादला जाण्याचीही शक्यता आहे.

Updated: Aug 5, 2018, 12:24 PM IST
मोदींचे नेहरुंच्या पावलावर पाऊल, कुंभमेळ्याच्या तयारीवर जातीने ठेवणार लक्ष title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीत जातीने लक्ष घालणार असल्याचे समजते. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनात विशेष रस घेतला होता. आगामी वर्षात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने भाजपला कुंभमेळ्याच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण होण्याची आशा आहे. त्यामुळे केंद्र सरकार कुंभमेळ्याच्या आयोजनात कोणतीही कसर राहणार नाही, याची काळजी घेत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अलाहाबादला जाण्याचीही शक्यता आहे. यापूर्वी १९५४ साली कुंभमेळ्याच्या तयारीसाठी  पंडित जवाहरलाल नेहरुंनीही केंद्राला थेट आदेश दिले होते. 

त्यावेळी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली होती. मेळ्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट पोलीस मुख्यालयात कळवली जायची. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी याचप्रकारे कुंभमेळ्याचे नियोजन करतील, असे सांगितले जात आहे.