पंतप्रधान नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात एक मोठी घोषणा करणार आहेत. 

Updated: Sep 25, 2017, 05:49 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात मोठी घोषणा  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात एक मोठी घोषणा करणार आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही घोषणा गरिबांसाठीची योजना असेल असं अरुण जेटली म्हणालेत.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीमध्ये बैठक सुरु आहे. यावेळी जेटलींनी ही माहिती दिली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला विरोध हा यूपीएचा अजेंडा कधीच नव्हता. भाजप आता त्याविरोधात पावलं उचलंत असल्यामुळे यूपीएला त्रास होत असल्याचं जेटली म्हणाले.

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपट्ट करण्याचं आमचं उद्दीष्ट असल्याची प्रतिक्रिया जेटलींनी दिली आहे. तसंच २०१९मध्ये भाजपचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.