जगाच्या सफरीसाठी निघालेल्या तरुणींना मोदींनी दिल्या शुभेच्छा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नौकाविहारातून 'आयएनएसव्ही तारिणी'त उपस्थितांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. 

Updated: Oct 20, 2017, 08:03 AM IST
जगाच्या सफरीसाठी निघालेल्या तरुणींना मोदींनी दिल्या शुभेच्छा title=

नवी दिल्ली : दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नौकाविहारातून 'आयएनएसव्ही तारिणी'त उपस्थितांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी 'आयएनएसव्ही तारिणी' आणि इतर कर्मचाऱ्यांसह चालकांना अनेक प्रश्नही विचारले. संपूर्ण देशाच्या वतीने पंतप्रधानांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

'तुम्ही तुमच्या मिशनमध्ये यशस्वी होऊन परता' अशी सदिच्छा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. व्हिडिओ कॉलमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान, आयएनएसव्ही तारिनी कर्मचारी सदस्य लेफ्टनंट सीडीआर वर्तिका जोशी आणि लेफ्टनंट पायल गुप्ता या दोघींना वाढदिवसाच्या अॅडव्हान्स शुभेच्छाही मोदी यांनी दिल्या. भारतीय नौसेनेचे नौकायन  'आयएनएसव्ही तारिनी' आपल्या पहिल्या क्रुझवर आहे. यातील चालक दलात सर्व सदस्य महिला आहेत. 

नेव्हीची महिला टीम संपूर्ण जगाच्या सफरीसाठी निघाली आहेत. या नौकेला या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. भारतीय महिलांच्या चमूने सागर नौकायन क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. 

ऑगस्ट २०१७ मध्ये भारतीय नौदलाची पहिली महिला टीम युवकांमध्ये नौदलाबद्दल धैर्य व सद्भाव वाढवणे या हेतूने ही टीम जगभरात फिरण्याच्या मिशनवर उतरला आहे.