पंतप्रधान मोदींना साधला बचत गटातील महिलांशी संवाद

यवतमाळच्या महिलांनी पंतप्रधानांशी संवाद साधत आपले अनुभव आणि यशोगाथा त्यांना सांगितल्या. 

Updated: Jul 12, 2018, 05:06 PM IST
पंतप्रधान मोदींना साधला बचत गटातील महिलांशी संवाद title=

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील स्वयंसहायता बचत गटांच्या महिला सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यवतमाळच्या महिलांनी पंतप्रधानांशी संवाद साधत आपले अनुभव आणि यशोगाथा त्यांना सांगितल्या. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी बुद्रुक येथील पशुसखी रंजना बाबुराव कामडी, वर्धेच्या सिंदी मेघे येथील लक्ष्मी शेंडे आणि नागपूरच्या कोलार गावातील सोनू मंधारे यांचेशी पंतप्रधानांनी संवाद साधला. 

यावेळी पंतप्रधानानी रंजना कामडी यांच्याकडून शेऴीपालन, लक्ष्मी शेंडे यांच्याकडून पापड उद्योग, तर सोनू मंधारे या तरुणीने डीडीयु जेकेवायद्वारे प्रशिक्षण घेऊन बीपीओ कार्यपालक म्हणून करीत असलेल्या कामाविषयी माहिती दिली. पंतप्रधानांशी संवाद झाल्याने स्वयंसहायता समूहाच्या या महिलांनी आनंद व्यक्त करून भविष्यात आणखी परिश्रम घेऊन यशाची उत्तुंग भरारी घेऊ असा विश्वास व्यक्त केला.