Digital Banking नेमकं आहे तरी काय? पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

भारतातील सामान्य माणसाला सक्षम बनवणे, त्यांना सशक्त बनवणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. 

Updated: Oct 17, 2022, 03:34 PM IST
Digital Banking नेमकं आहे तरी काय?  पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन  title=
PM Narendra modi inaugrated 75 digital banking unit in 75 districts of country today nz

Digital Banking: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील दोन डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) सह एकूण 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) आर्थिक समावेशाचा विस्तार करतील, नागरिकांचा बँकिंग अनुभव सुधारतील. ते म्हणाले की, आज देशातील प्रत्येक एक लाख प्रौढ लोकसंख्येमागे बँक शाखांची संख्या जर्मनी, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांपेक्षा जास्त आहे. (PM Narendra modi inaugrated 75 digital banking unit in 75 districts of country today nz)

आणखी वाचा - Kidney Stone: मुतखडा झाल्यावर तुम्ही 'हे' पदार्थ खात असाल तर आताच थांबा

 

सर्वसामान्यांचे जीवनमान बदलण्याच्या संकल्पाने आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत. प्रणाली सुधारणे आणि पारदर्शकता आणणे हा आमचा संकल्प आहे. पंतप्रधान म्हणाले की, भारतातील सामान्य माणसाला सक्षम बनवणे, त्यांना सशक्त बनवणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. त्यामुळेच समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून आम्ही धोरणे आखली आणि संपूर्ण सरकार त्याच्या सोयीच्या आणि प्रगतीच्या मार्गावर चालले.

डिजिटल बँकिंग (Digital Banking) म्हणजे काय

डिजिटल बँकिंग हा एक प्रकारे पारंपारिक बँकिंगचा प्रकार आहे. डिजिटल बँकिंग आणि इतर बँकांमध्ये फरक एवढाच आहे की त्यांची प्रत्यक्ष शाखा नाही. ते पूर्णपणे ऑनलाइन आहे. तुम्ही ते फक्त इंटरनेटद्वारे वापरू शकता. तुम्ही मोबाईलवरही या सेवेचा लाभ घेऊ शकता. डिजिटल बँकिंगद्वारे तुम्ही ऑनलाईन खाती उघडू शकता, पैशांची देवाण-घेवाण करु शकता इतकंच नव्हे तर बॅंक बॅलेंस तपासणे,  फंड ट्राँसफर करणे, पासबुक प्रिंट करणे, क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी अप्लाय करणे हे सगळं तुम्ही डिजिटल बँकिंगमध्ये करु शकता. डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून बिले सुद्धा भरु शकता. 

आणखी वाचा - 'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई

 

 

बँकिंग सेवा घरोघरी पोहोचवण्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज, भारतातील 99 टक्क्यांहून अधिक गावांमध्ये पाच किमीच्या आत कुठल्या ना कुठल्या बँक शाखा, बँकिंग आउटलेट आहेत. या सेवा पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होतील. यामध्ये सुविधा आणि मजबूत डिजिटल बँकिंग सुरक्षा असेल. जेव्हा कोणी खेडे आणि लहान शहरांमध्ये डिजिटल बँकिंग युनिटची सेवा घेते तेव्हा पैसे पाठवण्यापासून ते कर्ज घेण्यापर्यंत सर्व काही सोपे आणि ऑनलाइन होईल.