PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश  

सायली पाटील | Updated: Jun 7, 2024, 07:48 AM IST
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी  title=
PM Modis Oath taking Ceremony guest list with surprise latest update

PM Modis Oath Taking Ceremony : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election Results 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर आणि भाजपप्रणित एनडीएनं बहुमताचा आकडा गाठल्यानंतर आता लगबग सुरु झाली आहे ती म्हणजे पंतप्रधानपदाच्या शपशविधीची. एनडीएचे नेते आण (Varanasi Loksabha Contituency) वाराणसीतून खासदारपदी निवडून आलेले नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा  देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अतिशय दिमाखदार स्वरुपात रविवारी 9 जून रोजी देशातील या महत्त्वाच्या पदासाठीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शेजारधर्म प्रथम, या तत्त्वानुसार भारताच्या बाजूला असणाऱ्या देशांतील प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 

यामध्ये बांगलादेश, भूटान, नेपाळ, मॉरिशिअस, श्रीलंका, सेएशेल्स आणि यासोबतच (Maldives) मालदीवचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. प्राथमिक सूत्रांच्या माहितीनुसार या देशांचे प्रतिनिधी शपथविधीच्या वेळी हजर राहणार आहेत. सर्वप्रथम या यादीत मालदीव आणि Seychelles च्या नावांचा समावेश करण्यात आला नव्हता, पण गुरुवारी नव्यानं तयार करण्यात आलेल्या यादीत या देशांचाही समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 

पाहुणे मंडळींच्या यादीत मालदीवचे पंतप्रझान मोहम्मह मुईज्जू यांचं नाव येताच अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. मालदीव आणि भारतामध्ये धुमसणारी वादाची ठिणगी कोणापासूनही लपून राहिलेली नाही. त्यातच या वादाचा मालदीवच्या पर्यटनाला बसलेला फटला आणि त्यानंतरची परिस्थिती हे संपूर्ण चित्र पाहता मालदीवप्रती भारताली सध्याची भूमिका अनेकांचं लक्ष वेधून जात आहे. 

हेसुद्धा वाचा : ‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती

 

भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्यास सज्ज णसणआऱ्या नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीतील यशासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक, मालदीव, फ्रान्स, इस्रायल आणि जपानसह जपळपास 90 हून अधिक नेतेमंडळींनी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. भविष्यातील मैत्रीपूर्ण नात्यासाठी या शुभेच्छा देत इतर देशांशी भारताचं नातं आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं उचलण्यात आलेलं हे एक पाऊल होतं. 

एनडीए करणार सत्तास्थापनेचा दावा... 

शुक्रवारी NDA सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी 11 वाजता NDAच्या घटकपक्षांच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या NDA चे नेते म्हणून निवड करण्यात येणार आहे. इथं मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि एकमताने मोदींची नेतेपदी निवड करण्यात येईल. यावेळी भाजप आणि NDAतील घटकपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. मोदींची नेतेपदी निवड झाल्यानंतर सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तर संध्याकाळी NDAचे नेते राष्ट्रपतींकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील.