ब्रिक्सच्या मंचावर पडला होता तिरंगा; PM Modi यांनी पाहताच क्षणी उचलून खिशात ठेवला; Video तुफान व्हायरल

BRICS Summit South Africa : ग्रुप फोटोदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तिरंगा जमिनीवर पाहिल्यावर त्यांनी त्यावर पाऊल न ठेवण्याची काळजी घेतली. पंतप्रधानांनी तिरंगा उचलला आणि सोबत ठेवला. 

Updated: Aug 23, 2023, 05:37 PM IST
ब्रिक्सच्या मंचावर पडला होता तिरंगा; PM Modi यांनी पाहताच क्षणी उचलून खिशात ठेवला; Video तुफान व्हायरल title=
PM Modi Picks Up Tiranga

PM Modi Picks Up Tiranga : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे सध्या ब्रिक्स शिखर परिषद सुरू आहे. मंगळवारपासून 15 वी ‘ब्रिक्स’ शिखर परिषद (BRICS Summit) सुरू झाली. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं सन्मानाने स्वागत केलं. त्यावेळी अनेक भारतीय लोकांनी मोदींच्या स्वागताची तयारी केली होती. या परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असणार आहे. तर मंगळवार ते गुरूवार असं तीन दिवस ही शिखर परिषद सुरू असणार आहे. अशातच आता शिखर परिषदेतील एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ग्रुप फोटोदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावर उपस्थिती लावली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा देखील तिथं उपस्थित होते. मोदी जेव्हा मंचावर गेले, त्यावेळी त्यांनी मंचावर ठेवलेला तिरंगा उचलला. पंतप्रधानांनी कुठे उभा रहावं, यासाठी त्याठिकाणी ध्वज ठेवण्यात आला होता. मोदींनी पाहताच क्षणी ध्वज उचलला आणि खिशात ठेवला. मोदीचं हे कृत्य पाहिल्यानंतर आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही आपल्या राष्ट्राचा ध्वज उचलला आणि खिशात ठेवला.

आणखी वाचा - Chandrayaan 3 Landing LIVE: अवघ्या काही मिनिटात इतिहास घडणार! NASA ला जमलं नाही ते ISRO करून दाखवणार? जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

पीएम मोदींनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत फोटो काढले. जोहान्सबर्ग येथे बुधवारी 15 व्या ब्रिक्स परिषदेच्या सत्रात पंतप्रधानांनी भाग घेतला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सत्रात भाग घेतला होता.