'राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा घटनेला धक्का'

कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही.

Updated: May 15, 2018, 09:59 PM IST
'राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा घटनेला धक्का' title=

नवी दिल्ली : कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता येऊ नये म्हणून काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. तसंच कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. २२२ आमदरांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज आहे. आपल्याकडे ११७ आमदार असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी बोलवावं अशी मागणी काँग्रेस आणि जेडीएसनं राज्यपालांकडे केली आहे. तर भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांनी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावं अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. आता राज्यपाल याबद्दल काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

मोदींचा काँग्रेसवर आरोप

कर्नाटकमध्ये भाजपनं उल्लेखनीय यश मिळवलं असून, काँग्रेसनं मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी घटनेलाच धक्का लावल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. कर्नाटक निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.