लग्नपत्रिकेवर मोदींचा फोटो... गिफ्ट म्हणून मागितली ही गोष्ट

लग्नाची अनोखी पत्रिका

Updated: Nov 19, 2018, 12:31 PM IST
लग्नपत्रिकेवर मोदींचा फोटो... गिफ्ट म्हणून मागितली ही गोष्ट title=

बंगळुरु : लग्नाची पत्रिका अधिक सुंदर आणि आकर्षक कशी असावी याकडे सगळ्यांचाच कल असतो. अनेक जण वेगवेगळ्या प्रमारे लग्नाचा पत्रिका छापतात. पण कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने वेगळ्याच प्रकारे पत्रिका छापली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. या जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे.

मोदी सरकारची कामगिरी

बंगळुरुमध्ये राहणाऱ्या या जोडप्याने पंतप्रधान मोदींच्या फोटोसह सरकारने केलेल्या कामं देखील पत्रिकेवर छापली आहेत. या जोडप्याने आपल्या लग्नाची पत्रिका छापण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नावाचा आधारा घेतला आहे.

काय मागितलं गिफ्ट

लग्नाच्या पत्रिकेवर लिहिलं आहे की, 'तुम्ही पंतप्रधान मोदींना मतदान करा. हेच आमच्यासाठी गिफ्ट असेल.' ही पत्रिका सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अनेक जण याला शेअर करत आहे. वर प्रवीण सोमेश्वर यांनी स्वत: हे कार्ड डिझाईन केलं आहे.

31 डिसेंबरला विवाह

कुवैतमध्ये काम करणाऱ्या प्रवीण सोमेश्वर यांनी म्हटलं की, पीएम मोदींचं काम आणि त्यांच्या इच्छाशक्तीचं कौतूक करायला हवं. हा त्याच्याच एक छोटासा भाग आहे. ही लग्नपत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आली आह. बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरला यांचा विवाह होणार आहे.