PM Modi met Major Amit in Kargil: कारगिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सैनिकांसह दिवाळी (Diwali 2022) साजरी केली. पंतप्रधान 2014 पासून सातत्याने सैनिकांसह दिवाळी साजरी करतात. यावर्षी त्यांनी कारगिलमध्ये (Kargil) जाऊन लष्करी तळाला भेट दिली. देश प्रगती करताना पाहून सैनिकांनाही सीमेवर हुरूप येतो, देश अंतर्गत आणि बाह्य शत्रूंविरोधात दंड थोपटून उभा आहे. कारगिलने नेहमीच दहशतवादाचा फणा ठेचलाय असं मोदी म्हणाले.
दरम्यान, एका जवानाने पंतप्रधान मोदी यांना एक खास गिफ्द दिलं. जे गिफ्ट पाहून पंतप्रधान मोदी भावूक झाले. पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान मेजर अमित यांनी त्यांना एक फोटो गिफ्ट केला. (PM Modi met Major Amit in Kargil)
2001 मधल्या भेटीचा फोटो
मेजर अमित (Major Amit) यांनी पंतप्रधान मोदी यांना जो फोटो भेट दिला तो 2001 साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा होता. त्यावेळी मोदी यांनी गुजरातच्या बालाचडी इथल्या सैनिक स्कूलला भेट दिली होती. या सैनिक शाळेत अमित हे त्यावेळी शिक्षण घेत होते. फोटोत अमित आणि आणखी एक विद्यार्थी नरेंद्र मोदी यांना शील्ड दाखवताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी झाले भावूक
मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये सैनिक शाळेला भेट दिली होती. त्यावेळच्या क्षणांच्या आठवणींनी मोदी भावूक झाले. यावेळी मोदी यांनी मेजर अमित यांच्याशी गप्पाही मारल्या.
जवानांबरोबर साजरी करतात दिवाळी
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी सीमेवर तैनात असलेल्या जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. सलग नवव्या वर्षी त्यांनी दिवाळीनिमित्ताने जवानांची भेट घेतली. याआधी पंतप्रधान मोदी यांनी 23 ऑक्टोबर 2014 ला सियाचिन, 11 नोव्हेंबर 2015 ला पंजाब, 20 ऑक्टोबर 2016 ला हिमाचल, 18 ऑक्टोबर 2017 ला जम्मू-काश्मिरमधलं गुरेज, 7 नोव्हेंबर 2018 ला उत्तराखंडमधल्या हर्षिल, 27 ऑक्टोबर 2019 ला राजौरी एलओसी, 14 नोव्हेंबर 2020 ला जैसलमेरमधलं लोंगेवाला पोस्ट आणि 4 नोव्हेंबर 2021 को राजौरीमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये दिवाळी साजरी केली होती.