PM Kisan योजनेसंदर्भात मोठी बातमी! शेतकऱ्यांना सरकारला परत करावे लागणार पैसे

PM Kisan Scheme Update: तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा

Updated: Sep 8, 2022, 09:01 PM IST
PM Kisan योजनेसंदर्भात मोठी बातमी! शेतकऱ्यांना सरकारला परत करावे लागणार पैसे title=
प्रतिकात्मक फोटो

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी (Farmer) आताची ही मोठी बातमी. या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात आलेले पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. केंद्र सरकारकडून (Central Government) याबाबत माहिती देण्यात आली आहे. तपासात अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. 

का करावे लागणार पैसे परत?
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी याबाबत माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तपासली असता यात तब्बल 21 लाख शेतकरी अपात्र ठरले. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांविरोधात कडक पाऊल उचललं जाणार असून या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात आतापर्यंत आलेले सर्व पैसे परत करावे लागणार आहेत. 

या महिन्याच्या अखेरपर्यंत 12 वा हप्ता
दरम्यान, पीएम किसान योजनेचा 12 वा हफ्ता या महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ज्यांनी KYC पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

2000 रुपयांचे 3 हफ्ते
शेतकऱ्यांनी आपली योग्य माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. ज्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतील. सरकारतर्फे शेतकऱ्यांना 2000 हजार रुपयांचे तीन हफ्ते दिले जातात.