सरकार देतं २ लाखांचा जीवन विमा, कसा मिळवाल लाभ...?

एसबीआयमध्ये जन धन खाते आणि रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत नि: शुल्क आपत्कालीन विमा संरक्षण देण्यात येत आहे. 

Updated: Jun 16, 2021, 05:40 PM IST
सरकार देतं २ लाखांचा जीवन विमा, कसा मिळवाल लाभ...? title=

मुंबई : भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या खातेदारांसाठी चांगली ऑफर आहे. एसबीआयमध्ये जन धन खाते आणि रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत नि: शुल्क आपत्कालीन विमा संरक्षण देण्यात येत आहे. यामध्ये जन धन खातेधारक विनामूल्य विमा घेऊ शकतात.

प्रधानमंत्री जन-धन योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री जन-धन योजना 2014 मध्ये (PM Jan Dhan Scheme) सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती,  विमा, निवृत्तीवेतन इत्यादी सुविधा पुरवाव्या लागतात. कोणतीही व्यक्ती केवायसीची कागदपत्रे देऊन जन धन खाते ऑनलाइन उघडू शकते. मूलभूत बचत खाते देखील जनधन खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते.

याचा लाभ कोणाला मिळणार?

ज्यांच्याकडे जन धन अकाऊंट आहे त्यांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय (PM Jan Dhan Scheme) कार्ड मिळते. सुरुवातीला रुपे पीएमजेडीवाय कार्डची विमा रक्कम १ लाख रुपये होती परंतु 28 ऑगस्ट, 2014 नंतर देण्यात आलेल्या रुपे कार्डवर अपघाती कव्हर बेनिफिट २ लाखांपर्यंत उपलब्ध आहे.

फायदा कसा मिळणार?

पैसे मिळवण्यासाठी प्रथम तुम्हाला क्लेम फॉर्म भरावा लागेल. यासह मूळ मृत्यू प्रमाणपत्र किंवा प्रमाणित प्रतही जोडावी लागेल. एफआयआरची मूळ किंवा प्रमाणित प्रत द्यावे लागेल. पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि एफएसएल अहवाल देखील त्यामध्ये द्यावा लागेल. त्याच बरोबर आधार कार्डाची प्रत. RuPay कार्ड हे सर्व कागदपत्रे 90 दिवसांत सादर कराव्या लागतील. नॉमिनीचे नाव, बँकेचे डिटेल्स आणि पासबुक कॉपी जमा करावी लागेल.

किती दिवसात काम होईल?

क्लेम फॉर्म आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर, 10 वर्किंग दिवसांच्या आत तुम्हाला पैसे मिळतील.