BSF जवानाचा पगार कपात केल्याने मोदी नाराज, मग केलं असं काही...

  बीएसएफचा एक कॉन्स्टेबल संजीव कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापूर्वी श्री नाही म्हटले म्हणून त्याचा पगार कट करण्याचा शिक्षेची दखल स्वतः पंतप्रधानांनी घेतली आहे. बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटरवर ही माहिती दिली आहे. 

Updated: Mar 7, 2018, 05:45 PM IST
 BSF जवानाचा पगार कपात केल्याने मोदी नाराज, मग केलं असं काही...  title=

नवी दिल्ली :  बीएसएफचा एक कॉन्स्टेबल संजीव कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापूर्वी श्री नाही म्हटले म्हणून त्याचा पगार कट करण्याचा शिक्षेची दखल स्वतः पंतप्रधानांनी घेतली आहे. बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटरवर ही माहिती दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जवानाची सॅलरी कपात करण्याची शिक्षा रद्द करण्याचे आदेश दिले आहे. पंतप्रधानांनी या शिक्षा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पगार पुन्हा जवानाला देण्याचे आदेश बीएसएफला दिले आहेत. 

बीएसएफने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले की पंतप्रधान या प्रकरणी नाराज  आहे आणि त्यांनी पगार कपातीचा आदेश मागे घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणी शिक्षा देणाऱ्या कमांडेंटवर न्यायपूर्ण भूमिका नाही घेतल्याप्रकरणी इशारा दिला आहे. 

यापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाने एक बातमी प्रकाशित केली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापूर्वी श्री शब्द नाही न लावल्यामुळे कॉन्स्टेबल संजीव कुमार यांची ७ दिवसांची सॅलरी कट करण्यात आली. कमांडिग ऑफिसर अनूप लाल भगत यांनी या प्रकरणी अनुशासकत्मक कारवाई करत बीएसएफ कायद्यांतर्गत सेक्शन ४० नुसार दोषी मानण्यात आले.