लखनऊ : कुत्रे अनेकांना आठवतात तर अनेकांना कुत्र्यांची भीती वाटते. कुत्रा हा निष्ठावंत प्राणी मानला होता. घरातील सुरक्षेसाठी अनेक लोकं घरात कुत्रे पाळतात. मात्र हा आपला सगळ्यात लाडक्या कुत्रा आपलाच वैरी झाला तर...पण एका कुत्र्याने रौद्र अवतार घेतला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
लखनऊमधील बंगाल टोला परिसरात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. ज्या कुत्र्याला आपण आपल्या घरातील सदस्यासारखं प्रेम देतो. एका दिवशी तोच आपल्या मृत्यूचं कारण ठरेल, असा कधी कोणीही विचार करत नाही. मात्र लखऊनमध्ये एका पाळीव कुत्र्यानेच आपल्या मालकीणीचा जीव घेतला आहे. 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पिटबुल जातीचा हा कुत्रा आणि त्याची मालकीण घरात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. महिलेचा मुलगा हा जीम टेनर असल्याने तो जीमला गेला होता. महिला रुमच्या बाहेर आल्यावर पिटबुल या कुत्र्याने महिलेवर प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या शरीराचे लचके तोडले.
ज्यावेळी महिलेचा मुलगा घरी आला तेव्हा घरातील दृष्य पाहून मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेला उपचारासाठी नेत असतानाच तिने प्राण सोडला. सुशिला त्रिपाठी असं या महिलेचे नाव आहे.
या महिलेच्या घरात पिटबुल या जातीच्या कुत्रासोबतच लॅब्राडॉर या जातीचा अजून एक कुत्रा पण आहे. पिटबुल हा कुत्रा या महिलेच्या हातून रोज जेवत होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा घरातील सदस्य होता. मात्र मंगळवारी अचानक या कुत्र्याने मालकीणीचा विश्वासघात करत त्याच्याच मृत्यूला कारणीभूत ठरला.