PF Interest Rate | केंद्र सरकारचा चाकरमान्यांना मोठा दिलासा; PF व्याजात बदल नाही

 केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या EPFO च्या  बैठकीत सब्सक्राइबर्सला मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated: Mar 4, 2021, 04:44 PM IST
PF Interest  Rate | केंद्र सरकारचा  चाकरमान्यांना मोठा दिलासा; PF व्याजात बदल नाही title=

नवी दिल्ली :  आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एम्पलॉयी प्रोव्हिडंट फंड (Employee Provident Fund EPF)च्या  व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. असे झाल्यास ६ कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फटका बसला असता. परंतु  केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या EPFO च्या  बैठकीत सब्सक्राइबर्सला मोठा दिलासा मिळाला आहे.

EPFOच्या 6 कोटी पेक्षा जास्त सबस्क्राइबर्सला दिलासा मिळाला आहे. EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT)ने  2020-2021 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के इतका व्याजदर निश्चित केला  आहे. कोरोना काळात EPF च्या गुंतवणूकत घट झाल्याने व्याज दर कमी होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मंत्री  गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगर येथे झालेल्या बैठकीत  कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 केंद्र सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज देण्याची घोषणा केली होती. CBT ने म्हटले होते की, 31 मार्च पर्यंत दोन टप्प्यात व्याजाचे वाटप करण्यात येईल. यात 8.15 टक्के गुंतवणूकीतून आणि 0.35 टक्के व्याज इक्विटमधून व्याजाचे वितरण करण्यात येणार आहे.

EPF वर 7 वर्षांतील सर्वात कमी व्याज

आर्थिक वर्ष 2020 मध्ये EPF वर 8.5 टक्के व्याज मिळाले होते. हा व्याजदर गेल्या 7 वर्षातील सर्वांत कमी व्याज दर होता. गेल्या वर्षी 2019 मध्ये EPF वर 8.65 टक्के व्याज मिळाले होते. 2018 या वर्षी 8.55 टक्के व्याज मिळाले होते.  2016 या वर्षी 8.8 टक्के व्याज मिळाले होते. 

देशभरात EPFचे साधारण 6 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये अनेक लोकांच्या KYC मध्ये घोळ झाल्याने व्याज मिळण्यास उशीर झाला होता.