नवी दिल्ली : सीरियामध्ये सुरु असलेल्या तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडतायत. पेट्रोल आणि डिझेलचे दररोजच्या बदलत चाललेल्या दरामुळे आधीच सामान्य माणसाच्या खिशावर भार पडत चाललायत. त्यातच आता जागतिक स्तरावरील संकटामुळे यात अधिक भर पडणार असल्याचे दिसतेय. सीरियावरील हल्ल्यानंतर रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव आहे. तणाव इतका वाढला की काही तज्ञांच्या मते तिसऱ्या युद्धाचे सावट दिसतेय. जगभरात शेअर बाजारतही घसरण होतेय. सीरियावर अमेरिकेची क्षेपणास्त्रे टाकल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या खिशारवही दिसू शकतो.
खरंतर क्रूड ऑईलने तीन वर्षातील उच्चांक गाठलाय. यातच सीरियामधील संकट आणि इराणवरील नव्या प्रतिबंधामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम होऊ शकतो. रिसर्च फर्म जेपी मॉर्गनच्या मते बेंट क्रूडचे दर ८० डॉलर प्रति बॅरेल जाऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूडचे दर ७१.८५ डॉलर प्रती बॅरेल इतके होते.
सीनियर अॅनालिस्ट अरुण केजरीवालच्या मते भारतीय ऑईल कंपन्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करतात. याचे व्यवहारही अमेरिकन डॉलरमध्ये करावे लागतात. ब्रेंट क्रूडचे दर वाढले तर तेल आयात करण्यासाठी अधिक डॉलर खर्च करावे लागतील. त्यामुळे त्याचा परिणाम रुपयावर होतोय. यामुळे पेट्रोल-डिझेल वाढण्याची शक्यता आहे.
डॉलरचा भाव वाढल्याने रुपया कमजोर झालाय. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता अधिक आहे. रुपयाची घसरण झाल्याने आयात करणे महाग होणार. यासोबतच कच्च्या तेलासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. याचा सरळ परिणाम सरकारच्या तिजोरीवर होतो. सरकारचे कर्ज वाढत जाईल तसेच तोटाही वाढत जाईल. याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर पडेल.