बापरे ! पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा उसळी घेणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घडामोड

 आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती सध्याच्या किंमतीपेक्षा प्रति बॅरल 4 ते 6 डॉलरने वाढल्या आहेत.

Updated: Sep 18, 2021, 02:13 PM IST
बापरे ! पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा उसळी घेणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घडामोड title=

 मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे जागतिक भाव वाढल्याने OMC कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव वाढतो.

 चार ते सहा डॉलरने महाग
 सूत्राच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel)किंमती ऑगस्ट महिन्यात सरासरी किंमतीपेक्षा प्रति बॅरल 4 ते 6 डॉलरने महाग झाल्या आहेत. देशातील तेल कंपन्यांनी अद्यापतरी किंमती वाढवलेल्या नाही. परंतु आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाच्या किंमती याच स्तरावर राहिल्यास देशातील तेल कंपन्यांनाही पेट्रोल - डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करावी लागेल.
 
 महागाईत वाढ
 देशात पेट्रोल - डिझेलच्या किंमती वाढल्याचा परिणाम महागाईवर होतो. महागाईत वाढ होते. सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजा असणाऱ्या वस्तू आणि सेवा महाग होतात. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 110 रुपये प्रति लीटर तर डिझेल 100 रुपयांच्या जवळपास मिळत आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे. आता पुन्हा इंधनाच्या किंमती वाढल्यास महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसेल.