Petrol Diesel Price : सलग 18 व्या दिवशीही इंधनाचे दर स्थिर, ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळतय

Updated: Aug 4, 2021, 11:45 AM IST
Petrol Diesel Price : सलग 18 व्या दिवशीही इंधनाचे दर स्थिर, ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार का?  title=

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणारे बदल हे सामान्यांच्या खिशावर भार टाकत असतात. याच कारणामुळे सामान्यांचं किचन कोलमडतं. आज सरकारी तेल कंपन्यांनी आज 4 ऑगस्ट 2021 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आजही कंपन्यांनी कोणताही दरात बदल केलेला नाही. (Petrol Diesel Price Today 4th August 2021 : Ramains Unchanged for 18th Day Oil Price ) 

आज सलग 18 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे घरगुती बाजारातील ईंधनात उतार आला आहे. 

पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली नसली तरीही ते रेकॉर्ड स्तरावरच आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट महिन्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची काहीच आशा नाही. 4 ऑगस्ट 2021 मध्ये दिल्लीत पेट्रोलचा दर 101.84 रुपये आहे तर डिझेलची किंमत 89.87 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 107.83 रुपये आहे तर डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रती लीटर आहे. तर कोलकाता, चेन्नई पेट्रोलचा दर क्रमशः 102.08 रुपये आणि 102.49 रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेलचा दर 93.02 आणि 94.39 रुपये प्रती लीटर आहे. 

सामान्य माणसावर दबाव वाढत आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, नजीकच्या भविष्यात इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली जाणार नाही. भारत हा इंधनावर सर्वाधिक कर गोळा करणारा देश आहे. केवळ केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा व्हॅट कमी करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

अशा स्थितीत तेल कंपन्यांकडून किमती कमी करण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा बद्ध आहे. तेल कंपन्या इंधन कापण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. त्यांना डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही काळजी घ्यावी लागते.