Petrol Diesel Price on 9 March 2023 : नेहमीप्रमाणे आजही सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारी तेल कंपन्यांनी आज (9 मार्च) सकाळी अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today) वाढवल्या आहेत. यामध्ये यूपी, हरियाणा आणि महाराष्ट्रातील (Maharashtra Petrol Rate) अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ झाली. महाराष्ट्रात पेट्रोल 1.30 रुपयांनी महागले आहे. तर दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग होऊन 96.47 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.66 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. फरिदाबादमध्ये आज पेट्रोल 27 पैशांनी महागले असून ते 97.49 रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेल 26 पैशांनी वाढले असून 90.35 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात पेट्रोलचा दर 1.30 रुपयांनी वाढून 108 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 2.76 रुपयांनी वाढून 95.96 रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे गेल्या 24 तासांत कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड स्वस्त होऊन प्रति बॅरल $82.70 वर विकले गेले. तर WTI ची किंमत देखील प्रति बॅरल $76.70 पर्यंत घसरली आहे.
वाचा: सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.