Petrol Diesel Price: आठवड्याचा शेवट चांगला करण्यासाठी म्हणून तुम्ही एखाद्या लाँग ड्राव्हवर किंवा रोड ट्रीपवर जाण्याच्या विचारात असाल तर, आधी इंधनाचे दरही पाहून घ्या. कारण, सहलीच्या खर्चामध्ये हा घटतकही तितकाच महत्त्वाचा.
दर दिवसाप्रमाणं आजही देशातील महत्त्लाच्या तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरांबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. कंपन्यांकडून जारी करण्यात आलेले नवे दर पाहता या दरांमध्ये काही अंशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, काही शहरांमध्ये मात्र हे दर वाढलेलेच असल्याचं स्पष्ट ढालं आहे.
देशातील महत्त्वाच्या महानगरांपैकी एक असणाऱ्या चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर वाढले आहेत. इथं पेट्रोल 3 रुपये आणि डिझेल 2 रुपयांनी महाग झालं असून, त्यांचे नवे दर क्रमश: 10.266 आणि 94.26 रुपये प्रती लिटर इतके आहेत.
मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये प्रती लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रती लिटर
पुणे - पेट्रोल 106.17 रुपये प्रती लिटर, डिझेल 92.68 रुपये प्रती लिटर
अहमदाबाद - पेट्रोल 96.42 रुपये प्रती लिटर , डिझेल 92.17 रुपये प्रती लिटर
गुरुग्राम - पेट्रोल 96.89 रुपये प्रती लिटर, डिझेल 89.76 रुपये प्रती लिटर
नोएडा - पेट्रोल 96.65 रुपये प्रती लिटर, डिझेल 89.82 रुपये प्रती लिटर
दर दिवशी सरकारी कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. तुम्ही अगदी घरच्या घरी बसूनही हे दर तपासू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक एसएमएस करावा लागणार आहे. तुम्ही HPCL चे ग्राहक असाल तर, HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवा. इंडियन ऑईलचे ग्राहक असाल तर, RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवा आणि बीपीसीएल (BPCL) चे ग्राहक असाल तर, <डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा.
21 जुलै, 2023 या दिवशी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ झाल्याची बाब नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑईल आणि डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलबबात सांगावं तर या दोन्हीचा व्यवसाय सकारात्मक मार्गानं जाताना दिसत आहे. अधिकृत माहितीनुसार डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलच्या दरांमध्ये 0.37 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 75.63 डॉलर प्रती बॅरलनं व्यवसाय करताना दिसत आहे. तर, ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरांमध्ये 0.04 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रती बॅरलमागे त्याचे दर 79.67 डॉलर इतके आहेत.