Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या.

Updated: Nov 22, 2022, 08:08 AM IST
Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा    title=
Petrol Diesel Price in 22 November 2022 maharashtra

Petrol-Diesel Price Today 22 November 2022: जर तुम्ही पण चार चाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. 22 नोव्हेंबरलाही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Price in 22 November 2022 maharashtra)

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यानंतर नवीन दर जारी करतात. आज पुन्हा सरकारी तेल कंपनी IOCL ने नवीनतम दर जारी केला आहे.

 या शहरांमधील दर बदलले आहेत

- नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- पाटणामध्ये पेट्रोल 108.12 रुपये आणि डिझेल 94.86 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.40 रुपये आणि डिझेल 89.58 रुपये प्रति लिटर झाले आहे.

वाचा : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे

महानगरांमध्ये 1 लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत

-  दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 9.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 

Petrol Diesel चे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App मोबाईलवर डाऊनलोड करुन तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) SMS द्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.