महागाईचा मोठा भडका, पेट्रोलनंतर आता डिझेल शंभरीपार

Petrol, Diesel Price :देशात महागाईचा मोठा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीने यात अधिक भर पडली आहे. पेट्रोलनंतर आता डिझेलने शंभरी पार केली आहे. (Diesel Price hike) 

Updated: Oct 9, 2021, 09:43 AM IST
महागाईचा मोठा भडका, पेट्रोलनंतर आता डिझेल शंभरीपार title=
संग्रहित छाया

मुंबई :  Petrol, Diesel Price :देशात महागाईचा मोठा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीने यात अधिक भर पडली आहे. पेट्रोलनंतर आता डिझेलने शंभरी पार केली आहे. (Diesel Price hike) या इंधन दरवाढीचा भडका कायम दिसून येत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भाज्यांपासून ते धान्य, डाळी, खोबरे आणि खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत महागाईचा भस्मासूर दिसून येत आहे. (After petrol, diesel at almost Rs 100-mark in Mumbai)

इंधन दरवाढीने महागाईचा भडका

इंधन दरवाढीचा भडका कायम दिसून येत आहे. पेट्रोलनंतर डिझेलचीही आता शंभरी पार झाले आहे. मुंबईत डिझेल प्रतिलिटर 100.29 रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या किंमतीत 37 पैशांची वाढ झाली तर पेट्रोल दरात 29 पैसे वाढ झाली असून, 109.83 रुपयांवर पेट्रोल प्रतिलिटर पोहोचले आहे.

सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब

डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ आता शंभरीपार झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढत असून आता पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरात डिझेल मिळणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर वाढवले आहेत. सध्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून कोळसा आणि नैसर्गिक वायू दोन्हीचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे अनेक उद्योग त्यांच्या इंधनाच्या गरजा भागविण्यासाठी कच्च्या तेलाकडे वळले आहेत. दरम्यान, पुढच्या महिन्यापासून हिवाळा सुरु होत असल्याने जगात कच्च्या तेलाच्या मागणी वाढण्याची शक्यता आहे.