मुंबई : पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) च्या दरातील चढ-उताराचा फटका सामान्यांच्या खिशाला बसत आहे. देशातील इंधनांचा दर कायमच वेगवेगळा रेकॉर्ड रचत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या इंधन दरवाढीकडे आहे. जुलै महिन्यात पहिल्यांदा इंधनांच्या किंमतीत दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
राजधानी दिल्लीतही पेट्रोलचा दर झपाट्याने वाढला आहे. 100 रुपये प्रती लीटर दर पोहोचला आहेय दिल्लीत पेट्रोलची किंमत 99.51 रुपये प्रती लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत गेल्या काही दिवसांपासून वाढलेली आहे.
5 राज्यांच्या निवडणुकांनंतर 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 4 मेनंतर आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल 34 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 33 वेळा वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे.
आतापर्यंत अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली. मुंबई, चेन्न्ई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बंसवाड़ा, इंदौर, जयपुर, भोपाळ, ग्वालियर, गुंटुर, ककिनाडा, चिकमंगलुर, शिवमोग्गा, पटना आणि लेह यांचा समावेश आहे.
देशभरात 11 राज्यांत पेट्रोलचा भाव 100 रुपये प्रति लीटरच्या पार गेलं आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कनार्टक, तेलंगाना, जम्मू व कश्मीर, ओडिसा, तमिळनाडु, लडाख बिहार या राज्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ मध्ये आज पेट्रोलचा दर 107.43 रुपये प्रति लीटर आहे. देशभरात सगळ्यात महाग पेट्रोल हे राजस्थानच्या गंगानगरमध्ये आहे.