..तयार व्हा! आणखी वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडतायत. आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलच्या दराने चार महिन्यांचा उच्चांक गाठलाय तर डिझेलचे दरही वाढताच वाढे. आजच्या दरानुसार पेट्रोल ७३. ९५ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ६४.८२ प्रती लीटर विक्री होतेय. पेट्रोल आणि डिझेलच्या दर 

Updated: Apr 4, 2018, 01:05 PM IST
..तयार व्हा! आणखी वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर title=
नवी दिल्ली : भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडतायत. आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलच्या दराने चार महिन्यांचा उच्चांक गाठलाय तर डिझेलचे दरही वाढताच वाढे. आजच्या दरानुसार पेट्रोल ७३. ९५ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ६४.८२ प्रती लीटर विक्री होतेय. पेट्रोल आणि डिझेलच्या दर 
 

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढताच

२०१७मध्ये कच्च्या तेलाचा दर ४७.५६ डॉलर प्रति बॅरल होता. एप्रिल २०१८मध्ये हा दर वाडून ७६.६० डॉलर प्रति बॅरल झाला. वाढलेले हे दर पाहता एका महिन्यात ६३.८० डॉलरवरुन ७६.८४ डॉलरवर पोहोचलेय. याचाच अर्थ एका महिन्यात प्रति बॅरल १३ डॉलरची वाढ झाली. 
 

क्रूड उत्पादनात २ टक्क्यांची कपात

सर्वात मोठा तेल उत्पादक रशिया आणि ओपेकने कच्च्या तेलाच्या उत्पादनात दोन टक्क्यांची कपात केलीये. तज्ञांच्या मते व्यापार युद्ध आणि कोरिया देशांमधील ताणव कमी झाल्यानंतरही कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊ शकते. 
 

शेजारील राज्यांमधील दर 

देश पेट्रोल डिझेल
बांग्लादेश 69.53 50.69
पाकिस्तान 49.38 55.23
श्रीलंका 53.28 39.64
मलेशिया 37.04 36.39
इंडोनेशिया 48.73 43.53
फिलीपाईन्स 65.63 51.98
नेपाल 64.33 51.98
चीन 74.08 64.33
भारत 76.03 66.29