Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेल आज किती रुपयांनी विकलं जातंय?

Petrol-Diesel Price Today: मंगळवारी सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $ 92.01 वर वाढताना दिसले. ब्रेंट क्रूडही वाढले आणि ते प्रति बॅरल $ 97.95 वर पोहोचले.

Updated: Nov 8, 2022, 07:59 AM IST
Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेल आज किती रुपयांनी विकलं जातंय?  title=
today petrol diesel price in maharashtra

Petrol-Diesel Price Today 8th november: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) घसरल्यानंतर आता त्यात तेजीचा कल दिसून येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये विक्रमी पातळीवर घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. मात्र, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात अद्याप होताना दिसत नाही. देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक दिवसांपासून स्थिर असल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

उत्पादनात कपात झाल्याने क्रूडचे दर वाढले

गेल्या काही दिवसांत क्रूडच्या दरात विक्रमी घसरण होऊनही पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. दररोज सकाळी कंपन्यांकडून नवीन किमती जाहीर केल्या जातात. मंगळवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 92.01 वर वाढलेले दिसले. ब्रेंट क्रूडही वाढले आणि ते प्रति बॅरल $ 97.95 वर पोहोचले. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे क्रूडचे दर वाढत आहेत.

अनेक राज्यांनी व्हॅट कमी केला होता

तेलाच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.

वाचा : गुरु नानक जयंतीनिमित्त Bank Holiday, तर नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका बंद राहणार, जाणून घ्या

शहर आणि तेलाच्या किमती (Petrol-Diesel Price on 8th November)

- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.26 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर दररोज सकाळी 6 वाजता तेलाचे दर जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यास, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे राहत नाहीत. 

याप्रमाणे जाणून घ्या नवे दर 

तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.