Today Petrol Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. विक्रमी पातळीवर घसरलेल्या कच्च्या तेलात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचा दर रविवारी पूर्वीच्या किमतीवर स्थिर राहिले आहेत. दरम्यान, देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात.
साडेपाच महिन्यांपासून समान पातळीवर दर
ओपेक देशांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमतीत वाढ होताना दिसत आहे. या निर्णयाचा परिणाम असा झाला की विक्रमी पातळीपर्यंत घसरणारे क्रूड आता $100 च्या जवळ जाणार आहे. देशांतर्गत बाजारात गेल्या साडेपाच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. रविवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड $88.96 प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड $95.99 प्रति बॅरल या जुन्या स्तरावर दिसले.
सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले
तेलाच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.
वाचा : पंचांगानुसार 'या' शुभ वेळेत काम करा पूर्ण
शहर आणि तेलाच्या किमती (Petrol-Diesel Price on 13th November)
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
एसएमएसद्वारे जाणून घ्या दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Rate) रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.