पेट्रोलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी बदल, हे आहेत आजचे दर

पाहा आताचा दर 

पेट्रोलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी बदल, हे आहेत आजचे दर title=

मुंबई : ब्रेंट क्रूड गेल्या आठवड्यात 50 डॉलरने खाली कोसळल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात फरक झाला आहे. बुधवारी सकाळी ब्रेंट क्रूडचे दर 1.26 टक्के वाढून 59.46 डॉलर प्रति बॅरल या स्तरापर्यंत पोहोचले होते. 

या सगळ्यात देशातील नागरिकांना तेल कंपन्यांकडून सलग तिसऱ्या दिवशी तेलाच्या किंमतीत थोडा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दिल्लीसह चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल जुन्या दरांवरच सुरू झाले. सोमवारी पेट्रोल प्रती लीटर 21 पैशांनी वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी आणि बुधवारी या किंमतीत काहीच बदल झाला नाही. दिल्लीत बुधवारी पेट्रोव 68.50 रुपये आणि डिझेल 62.24 रुपये प्रती लीटर विकत आहे. 

चार महानगरांमधील दर 

ग्लोबल मार्केटमध्ये कच्चा तेलाची किंमत तेजी आल्यामुळे भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहे. बुधवारी कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर जुन्या स्तराने क्रमशः 70.64 रुपये, 74.16 रुपये आणि 71.07 रुपये प्रती लीटर राहणार आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये क्रमशः 62.24 रुपये, 64.01 रुपये, 65.12 रुपये आणि 65.70 रुपये प्रती लीटरच्या स्तरावर पोहोचले आहे. 

7 जानेवारीला पहिल्यांदा वाढली किंमत 

2019 या नवीन वर्षात 7 जानेवारीला पेट्रोलचा दर वाढला. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलचे दर क्रमशः 62.24 रुपये, 64.01 रुपये, 65.12 रुपये आणि 65.70 रुपये प्रति लीटर आहेत. 1 जानेवारीला पेट्रोलच्या दरात 19 पैशांनी कपात झाली आहे. 

2 आणि 3 जानेवारीला काहीच बदल झाला नाही. लेकिन, चार जानेवारीला 21 पैसे आणि 5 जानेवारीला 15 पैसे प्रती लीटर स्वस्त झालं आहे. यानंतर 6 जानेवारीला हा दर स्थिरावला. पण 7 जानेवारीला किंमतीत पहिल्यांदा वाढ झाली. त्यानंतर 8 जानेवारीला पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्ववत होते. 

येणाऱ्या दिवसांत वाढणार दर 

पुढील काही दिवसांत कच्चा तेलांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. 25 डिसेंबर 2018 ला 50 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचणारा ब्रेंट क्रूड यावेळी 57.56 डॉलर प्रती बॅरलच्या स्तरापर्यंत पोहोचला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते.