Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, आज किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today : वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी आणखीन एक झटका लागण्याची शक्यता आहे. कारण आज कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर होणार एवढे नक्की...चेक करा आजचे लेटेस्ट दर...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 11, 2023, 09:18 AM IST
Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, आज किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या  title=
Petrol and Diesel Rate Today 11 April 2023

Petrol Diesel Price on 11 April 2023 : गेल्या काही दिवसापासून कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कच्चा तेलाच्या किमती वाढल्यानंतर त्याचा थेट परिणाम पेट्रोल- डिझेलच्या दरावर दिसून येतो. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय कच्चा तेलाच्या किमतीत 0.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 79.90 वर डॉलर प्रति बॅरल व्यापार करत आहे. तर दुसरीकडे ब्रेंट क्रूड तेल 0.14 टक्क्यांने वाढले असून 84.30 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे. 

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले असून दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथील दर कायम आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता. त्या काळात सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर काही महत्त्वाच्या शहरात पेट्रोल महागले तर काही शहरात पेट्रोल स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाचा : घरगुती गॅस दरांबाबत महत्त्वाची बातमी

या शहरात पेट्रोल स्थिर

दिल्लीत (Delhi Petrol Rate) पेट्रोल 96.72 रुपये तर एक लिटर डिझेल 89.62 रुपयांनी विकले जाणार आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai Petrol Rate) पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपयांना विकलं जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर विक्री होत आहे. तर नाशिकमध्ये पेट्रोल 106.44 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.95 रुपये प्रति लिटरने विकले जाईल. 

शहर  पेट्रोलचे द (रु.)  डिझेलचे दर (रु.)
पाटणा  107.59 94.36 
लखनौ 96.57 89.76
चंदीगड 96.20 84.26
हैदराबाद 109.66 97.82
जयपूर 108.51 93.75
नोएडा 96.94 90.11
बेंगळुरू 101.94  87.89

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल - डिझेलचे दर 

शहर पेट्रोलचे द (रु.) डिझेलचे दर (रु.)
नागपूर 106.04 92.59
कोल्हापूर 106.56 93.09
पुणे 106.14 92.66
छत्रपती संभाजीनगर 108.75 95.96
परभणी 109.33 95.73

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.