Today Petrol-Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आज, 8 डिसेंबर रोजी गुजरात (Gujarat Election 2022) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Election 2022) विधानसभा निवडणुका 2022 चे निकाल देखील जाहीर होणार आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आज आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल झाला आहे हे जाणून घेऊयात. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today) दर किती आहेत? राजधानी दिल्ली व्यतिरिक्त इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील पेट्रोल (Today Petrol-Diesel Price) आणि डिझेलच्या किमती आठ महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. गेल्या वेळी 6 एप्रिल 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, सरकारने यावर्षी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. यानंतर, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेल (petrol-diesel rate) 6 रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आली.
चार प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
एसएमएसद्वारे चेक पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलवरील कराचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम दरांबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही एसएमएसद्वारे देखील अपडेट मिळवू शकता. इंडियन ऑइलचे (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात, HPCL चे ग्राहक HPPRICE 9222201122 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक त्यांच्या शहरात 9223112222 वर RSP पाठवू शकतात.