सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ...

ऑक्टोबर २०१७ पासून आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ३० टक्क्यांची घसरण झालीय

Updated: Dec 18, 2018, 12:09 PM IST
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ...  title=

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ दिसून आलीय. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतींत १० पैसे प्रती लीटर आणि डिझेलच्या किंमतीत ८ पैसे प्रती लीटरची वाढ झालीय. यामुळे मुंबईत पुन्हा एकदा पेट्रोलचा दर ७६.२५ रुपये प्रती लीटर तर डिझेलचा दर ६७.५५ रुपये प्रती लीटरवर पोहचलाय.

१० पैशांची वाढ झाल्यानंतर पेट्रोलचा दर दिल्लीत ७०.६३ रुपये प्रती लीटर, कोलकातामध्ये ७२.७२ रुपये प्रती लीटर झालाय. तर डीझेलमध्ये ८ पैशांची वाढ झाल्यानंतर चेन्नईमध्ये ६८.१४ रुपये प्रती लीटर, दिल्लीत ६४.५४ रुपये प्रती लीटर, कोलकातामध्ये ६६.३० रुपये प्रती लीटरवर दर पोहचलाय.

सोमवारीही पेट्रोलच्या किंमतीत २० पैसे प्रती लीटर आणि डिझेलच्या किंमतीत १० पैसे प्रती लीटर वाढ झाली होती.

उल्लेखनीय म्हणजे, ऑक्टोबर २०१७ पासून आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ३० टक्क्यांची घसरण झालीय. याचं एक कारण म्हणजे, मागणी कमी आणि पुरवठा जास्त...