संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक

संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला.

Updated: Sep 2, 2019, 11:45 AM IST
संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या विजय चौकात आर्यन गेट जवळ एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संसद भवनात चाकू घेऊन प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या या तरुणाची चौकशी करत आहे. हा तरुण लक्ष्मी नगर  येथे राहत असून त्याचं नाव सागर इसा असल्याचं कळतं आहे. शिवाय तो गुरमित राम रहिम सिंगचा अनुयायी असल्याची माहिती देखील एएऩआयने दिली आहे.

संशयित तरुणाचा चाकू घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न का करत होता याचं कारण अजून समोर आलेलं नाही. याआधी याचं वर्षी जुलै महिन्यात एका ऑडीकारने संसदेच्या परिसरात गोंधळ घातला होता. ही घटना पंतप्रधान कार्यलयापासून काही अंतरावरच घडली होती. 

सकाळी 4 वाजता ऑडी घेऊन चालक स्टंट करत होता. विजय चौकात त्याने गोँधळ घातल्यानंतर गाडी घेऊऩ तो तिथून निघून गेला.