सापाला हात लावला, साप हातासारखा झाला, नेमका प्रकार काय?

हा व्हिडिओ असा आहे, जो पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही

Updated: May 27, 2022, 05:09 PM IST
सापाला हात लावला, साप हातासारखा झाला, नेमका प्रकार काय? title=

मुंबईः सोशल मीडियावर तुम्ही धोकादायक सापांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. साप हा अतिशय विषारी प्राणी आहे, ज्याचा एकदा चावल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. तुम्ही तुमच्या घराभोवती साप पाहिले असतील.

सापाला पाहून बहुतेक लोकांची त्रेधा उडते. बहुतेक साप विषारी नसतात. कागद, लाकूड किंवा कशाचेही बनलेले नकली साप तुम्ही पाहिले असतील.

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ असा आहे, जो पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. वास्तविक, यामध्ये एका व्यक्तीने खऱ्या सापासारखे हात बनवून लोकांना आश्चर्यचकित केले आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की त्या व्यक्तीने आपले हात खऱ्या सापासारखे दिसण्यासाठी रंगवले आहेत. यासोबतच त्याने नागिनच्या बीन वाले म्युझिकसोबत त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ जर कोणी पहिल्यांदा पाहिला तर त्याला धक्काच बसेल. अर्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो खरा साप पाहत असल्याचा भास होईल. व्हिडिओच्या सुरुवातीला एका झाडासमोर एका माणसाचा हात दिसतोय. तुम्हाला दिसेल की त्या व्यक्तीच्या हाताचा काही भाग सिल्व्हर रंगाने रंगवला आहे आणि दोन बोटे लाल रंगात रंगवली आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यास खरा सापाचा भास होतो.