हिमाचलच्या बर्फावर चिंचेची चटणी, मिरची पावडर अन् मीठ; काय आहे हा विचित्र Food Trend

Social Media Food Trend: हिमाचलच्या बर्फावर चटणी, मिरची पावडर आणि मीठ टाकून खाल्लं जात आहे. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2024, 05:04 PM IST
हिमाचलच्या बर्फावर चिंचेची चटणी, मिरची पावडर अन् मीठ; काय आहे हा विचित्र Food Trend title=
People Eat Ice In Himachal With Chutney Chilli Powder Unique Food Trend Goes Viral

Social Media Food Trend: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेक फुड इन्फ्लुएन्सर विचित्र पदार्थांचे व्हिडिओ टाकत असतात. गुलाबजाम पाव, नटेला मॅगी असो किंवा चॉकलेट समोसा असे अनेक चित्र-विचित्र पदार्थांचा हल्ली ट्रेंड समोर येतोय. सोशल मीडियावर व्हायरल व फेमस झालेले पदार्थ प्रत्यक्षात खाण्याचे कोण धाडस करत असेल हे तर माहिती नाही. पण असे पदार्थ काही थांबत नाहीत. अशातच एक अनोखा पदार्थ व्हायरल होतेय. हा पदार्थ बनवण्याची पद्धत पाहूनच तुम्ही अवाक् व्हाल. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फ खाण्याची नवी पद्धत सध्या खूप चर्चेत आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

हिमालयीन बर्फाची रेसिपी

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर  ruc.hhiiiiii नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सगळ्यात पहिले एका मोठ्या ताटात बर्फाचे गोळे ठेवले आहेत. त्यानंतर बर्फाचा पूर्णपणे चुरा करण्यात आला आहे. त्यानंतर यात चिंचेची चटणी, लाल मिरची पावडर, मीठ आणि साखर टाकून व्यवस्थित मिक्स करण्यात आलं आहे. त्यानंतर एका वाटीत हे सगळे मिश्रण घेऊन चमच्याने सर्व्ह केले जात आहे. 

बर्फाचे गोळे माहितीयेत का?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 7 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत 86 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. पहिल्यांदाच अशी बर्फाची रेसिपी सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. बर्फाचे गोळे याबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. बर्फाच्या गोळ्यावर आवडत्या फ्लेवरचा ज्यूस टाकून देतात. मुंबईत गिरगाव न जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात असे स्टॉल लावलेले असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विचित्र रेसिपी

बर्फावर अशाप्रकार चटणी, लाल तिखट व मीठ टाकून खाल्लं जात असल्याचा पकार पहिल्यांदाच समोर येत आहे. अनेकांनी हा सर्व प्रकार विचित्र असल्याचे म्हणत नाकं मुरडली आहेत. तुम्हाला या व्हिडिओवर काय म्हणायचं आहे, हे आम्हाला नक्की कळवा?